Thursday 5 January 2017

आर्थिक नियोजन




ता. २ जानेवारी २०१७. सर्व प्रथम माझ्या सर्व वाचक मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला घना व राधा या नवविवाहित जोड्याची गोष्ट सांगणार आहे. जानेवारी ते मार्च हा साधारणपणे प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी महत्वाचे महिने. याचे महिन्यात तुमचे कामाचे मुल्यांकन करून तुमची पगार वाढ ठरणार असते. आज घनाची त्याच्या बॉस बरोबर चर्चा असते. बराच वेळ चर्चा झाल्यावर घना बॉस च्या केबिन मधून नाचतच बाहेर आला. ताबडतोब राधाला एक SMS पाठवला. आपण ठरल्याप्रमाणे ४१” LED च्या हप्त्याची सोय झाली बर का? १ एप्रिल पासून माझा पगार रु. ५,०००/- ने वाढला. राधा ने पण लगेच उत्तर पाठवले, अभिनंद मग आज कोणत्या हॉटेल मध्ये पार्टी देणार.

असा चित्र जवळ जवळ सर्व ठिकाणी पाहायला मिळते.

१ एप्रिल, घना व राधा एकदम खुश. ४१” LED घरी आणतो. दोघेही आनंदात चहा घेत LED पाहत या नवीन वस्तूचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात त्याची ५ वर्षा ची मुलगी त्यांच्या जवळ येते. आता संपूर्ण परिवार LED समोर असताना, काही केल्याने घनाला आनंद मिळत नसतो. एक प्रकाची अनामिक भीती त्याच्या मनात असते. पण काय ह्याचा उलगडा मात्र होत नाही. आपल्या नियोजन मध्ये काही तरी चुकतंय याची खात्री होते. पण काय चुकतंय हेच कळत नाही. शेवटी घना LED सोडून आपल्या रूम मध्ये जातो व शांतपणे विचार करू लागतो. पण विचारांना दिशा मिळत नाही व मन अधिकच अवस्थ होते. काहीच सुचत नाही.. कोणतीच दिशा मिळत नाही.. म्हणून घना उठतो व उद्या ऑफिस काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो. त्याला आठवते कि, आपल्याला परवा ऑफिसच्या कामासाठी मुंबई ला जायचे आहे व आपल्याला डेक्कन क़्विन चे आरक्षण करणे आवश्यक आहे. घना पटकन उठून बाहेर जायच्या तयारीला लागतो आणि अचानक त्याचे डोळे चमकतात. आरेच्या... मी मघापासून ज्यासाठी अस्वथ होतो ते तर खूपच सोप्प आहे. जसं मी माझ्या ऑफिस च्या कामाचे नियोजन करतो तसेच मला माझ्या भविष्यात येणाऱ्या गरजांसाठी “आर्थिक” नियोजन करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी काय आहेत व त्यासाठी काय करायचे याचा विचार करू लागतो.

घनाचे मन थोडा हलक होते. आता विचारांना थोडी दिशा मिळते. त्याला आता काय करायचे आहे याबद्दल सुचू लागते.

आज जी काही घनाची मानसिक अवस्था आहे. ह्या अवस्थे बद्दल या पृथ्वी वरील प्रत्येक माणसाला माहित आहे. पण त्या अवस्थेवर विचार न केल्यामुळे बऱ्याच लोकांना यावर उपाय सुचत नाही.  यावर उपाय म्हणजे, ‘वयक्तिक वित्त नियोजन” म्हणजेच “Personal Financial Planning”

घनाला या विषयाबद्दल जेव्हा समज येते तेव्हा घना जरा घाबरूनच जातो. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. वित्त नियोजन म्हणजे नेमके काय ? पण पैश्याचे नियोजन करायचे म्हणजे माझ्याकडे भरपूर पैसे हवे, माझ्या तुटपुंज्या पगार मध्ये कसलं नियोजन न काय? नियोजन करून घेण्यासाठी कोणाकडे जायचे ? नियोजन करणारा खूप पैसे घेईल का ? इत्यादी...

असे अनेक प्रश्नांचे ओझे घनाला मनावर यायला लागते. अशाच अवस्थेत तो बाहेर पडतो. मी, तुम्ही, आणि आपल्या सर्वांनसाठी “Personal Financial Planning” म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. ततपूर्वी आपण श्री. बुफेत  यांची काही कमाई, खर्च, बचत यावर काही मार्ग दर्शन तत्त्वे आहेत, त्या बद्दल आपण जाणून घेऊ. श्री. बुफेत म्हणतात:-

१.      आपण कधीही एकाच कमाई वर अवलंबून राहू नये. आपण अशा प्रकारे गुंतवणूक करावी कि त्यातून आपल्याला नवीन उत्पन्न सुरु होईल.

२.      खर्चाच्या बाबतीत श्री. बुफेत म्हणतात कि, जर आपण आपल्याला गरज नसेलेली वस्तू विकत घेतली तर, लवकरच आपल्याला गरजेच्या वस्तू विकाव्या लागतील.

३.      बचतीचे समीकरण खालील प्रमाणे: कमाई – बचत = खर्च

पण कमाई- खर्च = बचत असे असू नये.



श्री. बुफेत यांची तत्त्वे एकल्या नंतर घनाला ऐकेक प्रश्नाचा उलगडा होऊ लागला. घनाला आपण करत असलेल्या चुका लक्षात येऊ लागतात. कळून चुकते कि, LED चा आतातायी निर्णय घेतल्यामुळे विनाकारण वयक्तिक बोझा वाढून ठेवला आहे. पण तरी सुद्धा “Personal Financial Planning” म्हणजे काय याचा उलगडा होत नाही. बचत करावी लागेल, बचत करून गुंतवणूक केली पाहिजे, या गुंतवणीकीतून नवीन उत्पन्न झाले पाहिजे. पण नेमके किती गुंतवणूक करावी लागेल याबद्दल काही कल्पना आली नाही.

घनाच्या या प्रश्नांबद्दल आपण थोडे विचार करू वरील सर्व प्रश्न पाहता आपल्याला हे लक्षात येईल कि, “घनाला नक्की काय हवं आहे हेच कळत नाही,” त्याची आयुष्यातील नेमकी काय उधिष्ट आहेत हेच त्याला माहित नाही. चला तर आपण या गोष्टी समझुन घेण्यासाठी चार महत्वाचे प्रश्न बद्दल चर्चा करू. या चार प्रश्नाची उत्तरे देताना/ लिहताना आपण आपल्याला घनाला काय हवे आहे याचा नेमका उलगडा होईल,हे सर्व प्रश्न आपण आपल्यालाच विचारायचे आहेत.

प्रश्न १. आज पासून माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत (म्हणजे वय वर्ष ७५/८० पर्यंत) अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत व त्यामुळे मी आनंदी राहीन.



प्रश्न २. या सर्व गोष्टी मला त्या त्या वेळेत सध्या करायच्या असतील तर अशा कोणत्या अडचणी आहेत ज्यांना मला सामोरे जायचे आहे.



प्रश्न ३. अश्या कोणत्या उत्कृष्ट संधी मला साधायच्या आहेत ज्यावर मला १००% लक्ष केंद्रित करून त्यांना आपल्याजवळ पकडून ठेवायच्या आहेत.



प्रश्न ४. माझ्या मध्ये असे कोणते गुण आहेत ज्यावर मला आणखी काम करायचे आहे व या सर्व उद्धिष्ट पर्यंत पोहचण्यासाठी अशी कोणती Skill & Resourse वर काम करायचे आहे जे माझ्या कडे आज नाहीत.

या चार प्रश्नाची उत्तरे आपण आपल्या मनाप्रमाणे, प्रामाणिकपणे जर लिहिली तर आपली मानसिक अवस्था एकदम उच्च दर्ज्याची होईल. आपल्याला नेमके हे कळून जाईल कि,मला कोठे जायचे आहे. जेथे जायचे आहे तिथे जाण्यासाठी मला काय करायचे आहे आणि त्यासाठी किती वेळ आहे.  आजचा लेख जरी नोकरी करणाऱ्या व्यक्तीवर केंद्रित असला तरीही बहुतांश व्यावसायिक व शेतकरी मित्र याच मानसिकते मधून जातात. किंबहुना प्रत्येक व्यावसायिक व शेतकरी मित्राला यांच्या पैशाच्या नियोजना बाबतीत घना पेक्षा जास्त काळजी घेणे महत्वाचे आहे. तेव्हा मित्रांनो माझ्या पुढील लेखापर्यंत सर्वांची वरील चार प्रश्नांची स्वतः साठीची उत्तरे तयार करून ठेवा. आपण या विषयी सविस्तर बोलणारा आहोत. आज जर तुम्ही तयारी केलीत तर पुढील वाटचालीत त्याचा पूर्ण उपयोग करून घेता येईल.