दि. १ फेब्रुवारी २०१७, भारताचे वार्षिक बजेट
आपले वित्तमंत्री श्री. जेटली यांनी सादर केले. मागील दोन महिने आर्थिक नियोजन
यावरील लेख व बजेट यामध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत. बजेट मधील काही निर्णय हे
दूरवर साध्य करणाऱ्या उद्दिष्टांसाठीचे आहेत तर काही जवळचे. आर्थिक नियोजन भाग - १
मध्ये ज्या ४ प्रश्नांबद्दल सांगितले होते त्यापैकी पहिल्या २ प्रश्नांचे विश्लेषण
आपण केले आहे. तर आज पुढील २ प्रश्न पाहूया.
प्रश्न.३ असा आहे कि, “अश्या कोणत्या उत्कृष्ट
संधी मला शोधायच्या आहेत ज्यावर मला १००% लक्ष केंद्रित त्यांना आपल्याजवळ पकडून
ठेवायच्या आहेत.” व प्रश्न. ४ असा आहे कि, “माझ्या मध्ये असे कोणते गुण आहेत
ज्यावर मला आणखी काम करायचे आहे.”
मागील लेखा मध्ये घनाची उत्पनांची व खर्चाची
बाजू आपण पहिली. अधिक आकडेमोड न करता अगदी सोप्या भाषेत आपण घनाच्या घरचे आर्थिक
नियोजन, बजेट व भारताचे नियोजन व बजेट यामध्ये काय सांधर्म्य आहे ते पाहूया. एकमेव
सारखी गोष्ट म्हणजे, “दोघांच्याही खिशात जो १ रुपया येत आहे त्या रुपयाचे नियोजन
कसे करणार याचा विचार व अभ्यास करणे महत्वाचे”. म्हणजे काय तर पैसा हातात
येण्यापूर्वी त्याचे नियोजन झाले पाहिजे.
येणाऱ्या पैश्याचे नियोजन करत असताना वरील दोन
प्रश्नांचा विचार करणे फार महत्वाचे ठरते. आपण जर २०१७ बजेट मध्ये नमूद केलेल्या
ठळक नोंदी पहिल्यात तर – आपल्यासाठी काही नोंदीबाबत बोलूया:-
१.
२०१९ पूर्वी १ कोटी कुटुंबे
ही दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढणे.
२.
शेतकऱ्याच्या उत्पनामध्ये वाढ
करणे.
या दोन नोंदीवर आपण विचार केला तर असे लक्षात
येईल कि भारत हा कृषी प्रधान देश आहे. व भारताची प्रगती – कृषी क्षेत्राची प्रगती
झाल्या शिवाय होऊ शकत नाही. आता आपण घनाच्या बजेट कडे वळूया.
कितीही नियोजन केले तरी घनाचे खर्चाचे गणित
व्यवस्थित होतच नाही. कारण येणारा पैसा कशावर खर्च करायचा याच गणितच मांडलेल नाही.
म्हणून मग आलेला चंचल पैसा हा कोणत्यातरी वाटेने घनाच्या खिश्याबाहेर जातो आणि ज्या
गोष्टीवर खर्च व्हायला हवा तो होताच नाही. मग प्रगती खुंटते. तेव्हा प्रश्न. ३
मध्ये नमूद केल्याप्रमाणे जर घनाला स्वतःची प्रगती करायची असेल तर त्याला त्याच्या
संधीवर काम केले पाहिजे. म्हणजे असे... कि, नियोजनामध्ये स्वतःच्या कौशल्यावर काम
करणे महत्वाचे आहे. कौशल्यावर काम केले तर नवीन पैसा मिळवण्याचा मार्ग मिळेल व
आर्थिक स्वायंततेच्या दिशेने पुढचे पाउल पडेल.
बजेट मध्ये शेती, शेतकरी, खेड्यामधील लोकसंख्या,
तरुण मंडळी, आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी औषोधउपचार, पायभूत सुविधा, वित्तशाखा
तसेच सार्वजनिक सुविधा यावर भर दिलेला दिसतो. याचा अर्थ असा आहे कि भारताची
अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी वरील सर्व गोष्टीवर भर देणे सरकारला आवश्यक वाटले.
आता प्रश्न.४ मध्ये लिहिल्याप्रमाणे घनाला सुद्धा त्याची अर्थव्यवस्था मजबूत
करण्यासाठी काय काय केले पाहिजे यावर लक्ष दिले पाहिजे.
घनाला घरची आर्थिक व्यवस्था मजबूत होण्यासाठी
त्याने त्याच्यासाठी काय महत्वाचे आहे हे पाहीले पाहिजे. म्हणजे जर भारत देशाला
पायाभूत सुविधा चांगल्या करायच्या असतील तर देशाच्या खजिन्यात नवीन पैश्याची भर
पडली पाहिजे. वेगवेगळे कर हे देशाच्या उत्पनाचा एक मार्ग आहे. तसेच घनाला त्याच्या
घरी / घरच्यांना चांगले जीवन द्यायचे असेल तर चांगले आर्थिजन झाले पाहिजे. त्या
दृष्टीने घनाचे सदैव प्रयत्न असले पाहिजेत.
शेवटी काय तर देशाचे बजेट असो कि घनाचे वयक्तिक
बजेट असो, आर्थिकस्थिती मजबूत करायची असेल तर येणारा प्रत्येक रुपयाचे काटेकोरपणे
नियोजन करून, तो कोठे खर्च करायचा हे ठरवले पाहिजे. नुसत ठरवून उपयोग नाही. त्याची
अंबलबजावणी खूप व्यवस्थित केली पाहिजे.
देशाचे बजेट आपल्या डोक्याबाहेर आहे असे समजता
काम नये. थोडा खोलवर विचार केला तर लक्षात येईल कि यातून खूप शिकण्यासारखे आहे.
थोडा अभ्यास करून जर स्वतःच्या आर्थिक नियोजनावर भर दिला तर तो दिवस दूर नाही, ज्या
दिवशी आपला घना आर्थिकदृष्ट्या एकदम सक्षम होईल.
मागील दोन्ही लेख वाचल्या नंतर मला बऱ्याच वाचक
मित्रांनो फोन आले. सर्व म्हणाले कि घनाच्या ठिकाणी मी मलाच बघत होतो. त्यामुळे
मित्रांनो आता वेळ आलेली आहे, “घना जसा आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे तसच व त्याच ठिकाणी
स्वतःला बधाण्याची. Wish you all a
very Happy Financial Fitness
No comments:
Post a Comment