Thursday, 9 November 2017

एका नव्या दिशेचा शोध - तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग 3 and 4)

दबाब पेलावण्याची क्षमता

मनस्ताप होणे आणि दबाब पेलावण्याची क्षमता ह्या दोन्हीही खूपच जादूमय गोष्टी आहेत. याबद्दल पुढे जाण्यापूर्वी थोडे माझ्याबद्दल सांगतो.

माझ्या आयुष्यामध्ये खूप अडी-अडचणी आल्या. खूप गोष्टींना ( चांगल्या / वाईट ) सामोरे जावे लागेल. या इतर अनेक गोष्टीमुळे कधी कधी खूपच मानहानी सहन करावी लागली. कित्येक वेळा एका विचित्र आणि एकदम कठीण काळातून जावे लागले. याचा अर्थ असा नाही कि माझी सर्व ठिकाणी चूक होती. पण त्यावेळी सुचवलेली कल्पना योग्य वाटली म्हणून त्यावर काम करायला सुरवात केली. प्रत्येक वेळी एकच ध्यास होता कि, “मी आज जे करतो आहे त्यापेक्षा चांगले केले पाहिजे.” जे मी पूर्वी होतो त्यापेक्षा, लोकांना / जवळच्या माणसांना बरोबर घेऊन – जरा चांगले काम करणे एवढाच निर्मळ प्रयत्न. पण झालं उलट. या ठरवलेल्या व्यवसायामध्ये फायदा तर जाऊ दया, पण मनस्ताप मात्र खूप झाला.

खूप मानस्ताप इथं पर्यंत ठिक आहे. पण या अनुभवातून माझ्या एक गोष्ट लक्षात आली. माझी व्यावसायिक वाढ होण्यापूर्वी अश्या प्रकारे अडथळे हे सुरवातीला आलेच होते. पूर्वी एवढ कधी विचार केला नाही, पण मागील दोन वर्षात यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केला. अनेक यशस्वी संघटना यांचे कार्ये पाहीले. हा सर्व अभ्यास केल्यावर हे लक्षात आले कि, “अश्या प्रकारच्या घटना प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्यात घडतातच” यशाची पायरी चढताना यातून प्रत्येक व्यक्तिला जावेच लागते. हा तर एक नमुना (Pattern) आहे. मला हे लक्षात आले कि ह्या प्रकारच्या Pattern मधून यशस्वी प्रवास केल्यावर एक खोलवर, कायमस्वरूपी राहणारे परिणाम तयार होतात.

आज जर डोळे व मन नीट उघडून पाहीले तर एक गोष्ट लक्षात येईल कि आज समाजामध्ये जी काही शोकांतिका आहे ती फक्त या प्रवासाला धीराने सामोरे जाण्याएवजी त्यापासून पळून जाण्यामुळे झालेले आहेत. आता याचा व व्यवसायाचा काय संबंध आहे असे तुम्ही म्हणत असाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि, “या प्रवासाला धीराने सामोरे न जाणे, त्यातून पळवाट काढणे यामुळे फक्त नुकसानच होत असत. रस्ता बदलला म्हणून समोरून येणारा दबाव कमी होत नाही.” या उलट नवीन दिशेला विशेष काहीच माहिती नसल्यामुळे नुकसानीचा आकडा जास्तच वाढतो. या प्रवासामध्ये अथवा या pattern मधून जात असताना, त्याला धीराने सामोरे गेल्यामुळे खूपच चांगले, विलक्षण परिणाम बघायला मिळतात. तुम्हाला, तुमच्या आयुष्यात जे हवे ते मिळवण्यासाठी हा अडथळयाचा प्रवास तुमचा तुम्हालाच मार्गक्रमण करायचा आहे. आश्चर्य ची गोष्ट म्हणजे निसर्ग तुम्हाला ही गोष्ट पावलो – पावली सांगत असतो. मित्रांनो, ही निसर्गात चाललेली प्रक्रिया किंवा निसर्गाची ही देणगी तुम्हाला विसरून चालणार नाही. याचे एकमेव कारण कि, “पृथ्वीतलावरील प्रत्येक मनुष्य हा निसर्गाचा एक छोटा भाग आहे”. चला तर मग हे काय आणि कसं ते पाहूया.

जरा विचार करा कि जंगलामध्ये एक मोठ्ठ झाड आहे ते ऊन्मळून जमिनीवर आडवे पडले. काही दिवसांनी ते झाड कुजायला लागते व कालांतराने त्याचे अस्तित्व संपून जाते. म्हणजे काय निसर्गामध्ये जी गोष्ट एकटी असते ती गोष्ट / वस्तू (या मध्ये मनुष्य प्राणी ही ओघाने आलाच) निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याचे कार्य १००% करू शकत नाही. त्यामुळे त्याचे विघटन व्हायला सुरवात होते व कालांतराने लोप पावते. या गोष्टी तुम्ही मान्य करालच.

थोडे आजू बाजूला डोळे उघडून बघा. तुम्हाला अशी एखादी व्यक्ती दिसेल जी आयुष्यात काहीही करत नाही. नुसत T.V समोर बसून राहतात. त्यांच आयुष्य, त्यांची तब्येत एकदम खराब होत असते. याच प्रमाणे काही व्यावसायिक किंवा संस्था पाहिल्यातर एक गोष्ट लक्षात येते कि, “ ते फक्त आज मध्ये जगत असतात. उद्या नक्की काय होणार आहे याचा विचार न करता व्यवसाय करत असतात. नेहमी स्वतः पुरता  स्वार्थी विचार करतात व यामुळे एकटे पडतात.” निसर्ग कधीच चुकत नाही. तो त्याचे काम एकदम अविरत पणे करत असतो. निसार्गाच्या नियमाप्रमाणे जी व्यक्ती एकटी पडते, ती निसर्गात लोप पावते. हे असच काही तुमच्या मित्र परिवार व कौटिंबीक जीवनामध्ये असते. जर एखादयाकडे तुम्ही लक्ष दिले नाही तर कालांतराने संबंधांमध्ये दूरवा येतो व संबंध संपुष्टात येत्तात. निसर्ग कधीच चुकत नाही.

जर निसर्ग नियमांप्रमाणे नाही वागलात तर लवकर तुमचं अस्तित्त्व संपून जाईल यात तिळमात्र ही शंका नाही. पण प्रत्येकजन असा नसतो. निसर्गाने प्रत्येकाला स्वतः मध्ये बदल घडवून आणण्यासाठी क्षमता ही दिली आहे. प्रचंड दबाव योग्य वातावरणांमधील योग्य संधर्भ घेउन सहन केल्यावर कोळसा सुद्धा हिऱ्यामध्ये रूपांतर होतो. हिरा या पृथीतलावरील सर्वात कठीण वस्तू आहे. कोळसा हि निर्जीव वस्तू आहे. कोळश्याला पळून जाणे हा पर्याय माहिती नसतो. कारण तो विचार करू शकत नाही. कोळसा त्या प्रचंड दबावाला सहन करत स्वतः मध्ये बदल घडवत हिरा बनतो. पण विचारवंत मनुष्य प्राण्याचे असे नाही.     माणूस एखाद्या गोष्टी पासून पळून जातो, त्याला कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्यास भीती वाटते, याचे एकमेव कारण म्हणजे त्याच्या मनावर पडणारा दबाव (Pressure) तो सहन करू शकत नसतो. निसर्ग नियमाप्रमाणे जे दिनचर्या मध्ये चालले आहे त्यातच संतुष्ट राहणे ही माणसाची प्रवृत्ती. यालाच Comfort Zone असं म्हणतात. व्यवसायात यश मिळवायच असेल तर Comfort Zone तोडून बाहेर या असे खूप गुरु सांगतात. पण ते म्हणजे नक्की काय हे समझने गरजेचे आहे.

अगदी किटका पासून ते कोणत्याही मोठ्या प्राण्यापर्यंत या जगातील प्रत्येक जीवित गोष्टींकडे त्याच्या स्वतःच्या प्रगतीसाठी आरामाच्या सवयीतून (Comfort Zone) बाहेर पडण्याची क्षमता आहे. यासाठी तुम्हाला तुमची सध्याची मानसिकता याला आव्हान दिले पाहिजे. ह्या आव्हानाला सामोरे जाणे म्हणजे जास्त दबावाला सामोरे जाणे. थोडा विचार करा; जर एखादया वेळी तुमच्या मनावर खूपच दबाव आहे, याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये खूपच ऊर्जा आहे. त्या ऊर्जेमुळे तुम्ही खूपच चलबिचल झाला आहात. कधी कधी असं वाटत ना कि मनामध्ये एक स्पोट होईल. तुम्ही अतिशय ताण तणावाच्या वातावरणा  मध्ये आहात आणि त्याच वेळी तुमच्या समोर अजून एक नवीन संकट येते. तुमची पूर्णता १०० % कोंडी झालेली असते.

मला खात्री आहे, तुमच्या व्यवसायामध्ये अश्या अनेक प्रसंगाला तुम्ही सामोरे गेला असालच. अश्या वेळी तुम्ही काय केले. या प्रसंगापासून लांब पळून गेलात कि त्याला धिटाणे सामोरे गेलात. जे व्यावसायिक अयशस्वी होतात, त्यांनी त्यांची लढाई इथं सोडून दिलेली असते. याला हारण म्हणत नाही. तर याला पळून जाणे असे म्हणतात. पण मित्रांनो, निसर्गाने आपल्याला पळून जाणे हे शिकवलेले नाही. निसर्ग असे म्हणतो कि, “या दबावाला / परिस्थितीला तुम्ही योग्य पणे सामोरे गेलात. तर योग्य वातावरण तयार होईल. अश्या योग्य वातावरणात एक विलक्षण, चमत्कारीक गोष्ट घडते”. दबावाला यशस्वी सामोरे जाण्यासाठी मानसिकता तयार व्हायला लागते. म्हणजे काय कि, “जर तुम्ही पळून न जाता व्यवसायातील दबाव तसेच इतर कोणताही ताण तणावाला याला सामोरे जायचे ठरवता. त्यावेळी तुम्ही तो दबाव तसेच सहन करण्याच्या सर्वोच्च पातळीवर असता”. यावेळी जर तुम्ही दबावाखाली दबून गेलात तर ती उर्जा तुम्हाला हरवते. जर ही उर्जा एकदम व्यवस्थित हाताळली कि काहीतरी छान घडत आणि तुम्ही अधिक ताकदवर होता. अचानक सर्व दबाव, समस्या तुमच्यासाठी खूप छोट्या होतात.तुमच्यावर असलेला ताण कमी होतो. तुम्हाला हलक – हलक वाटायला लागता.  म्हणजे काय तुमच्यावर असलेली समस्या तुमच्या पेक्षा खूपच छोटी होते. Means now you are bigger than the Problem.

तेव्हा मित्रांनो, व्यवसायात अथवा जीवनामध्ये तुमच्या समोर उभी असणारी आव्हाने, समस्या, तुमच्या विरोधात होणाऱ्या गोष्टी / घटना तुम्हाला घडवत असतात. कोणीही व्यक्ती अथवा कोणतीही संस्था / कंपनी जो पर्यंत यांच्यावर व्यवसायाचा जो दबाब (Pressure) आहे, याच व्यवस्थापन सक्षम पण करत नाही; तो पर्यंत ती संस्था कधीच उत्कृष्ट होऊ शकत नाही. दबाब व ताण तणाव व्यवस्थापन हा तुमच्या व्यक्तीमत्व सुधारण्यात खूपच महत्वाचा भाग आहे. कारण दबाब व्यवस्थापन व्यवस्थित नाही झाले तर, तो दबाव तुमच्या भावनांच्या मार्गाने बाहेर पडतो. अश्यावेळी तुमचे सर्व निर्णय हे भवनीक होऊन जातात कारण एक लक्षात राहू द्या; “मनातून भावनिक झालात तर बैधिक पातळी कमी होते” व निर्णय चुकतात.

ही विलक्षण / जादूची कांडी मला जेव्हा मिळाली तेव्हा मी जास्त त्रागा न करता होणारा मनस्ताप मला आणखी घडवण्यात खर्च केला. भावनांना मनावर ताबा घेऊनच दिला नाही. कितीही समस्या आल्यातरी शांत / तटस्थ राहिलो आणि व्यवसायात नवीन आव्ह्ने पेलून आणखी मोठा होण्यास तयार झालो.


याचमुळे माझ्या मते, इतर अनेक गोष्टींबरोबर यशस्वी व्यवसाय / उद्योग करण्यासाठी  दबाब व्यवस्थापन खूपच महत्वाचे आहे. पुढील विक्री व्यवस्थापन मध्ये वाचताना तुमच्या हे आणखी लक्षात येईल. 

1 comment:

  1. Thank you
    Your blog is very wonderful.

    The desire to play gambling online.

    Sbobet Meet the framework of online baccarat game full of blood. In order to make gambling games, you have come to grips with the shape of the online gambling games, and many people have the desire to the fullest. Which players you are interested in and want to use the service to play baccarat online. All players will be exposed to the way of playing online gambling games in a way that you have never gotten rid of anywhere before.

    We also have a framework of services related to playing games, online lotto win. It is ready to help all gamers have come to indulge in the form of gaming online gambling. To all players to play. Come to the beat with the desire to play the game online gambling is numerous and full of fierce bloody.

    In addition, we also have the shape of the game online casino. The players all have to choose a national service that conveniently has a habitual gambler PRO mobile games everyone wants to have. คาสิโน

    ReplyDelete