अगदी ८ दिवसांपूर्वी एक वाचकमित्रांची भेट झाली. त्याने विचारले "पैशाची
भाषा" म्हणजे नेमके काय? त्याचा हा प्रश्न खूप चांगला आहे. याचं
कारण म्हणजे पैशाची भाषा हे सदर वाचताना माझा वाचक वर्ग हे अपेक्षित करत असेल
कि - गुंतवणूक कोठे व कशी करायची. पण
माझ्या मते - गुंतवणूक करण्यासाठी पैसे लागतो व तो चांगल्या प्रमाणात मिळाला
पाहिजे. चांगल्या प्रमाणात पैसा आला कि माणूस यशस्वी होतो. पण चांगल्या
प्रमाणात पैसा कमावण्यासाठी एक विशिष्ठ प्रकारची मानसिकता लागते. त्याच यशस्वी
मानसिकतेला आपण "पैशाची भाषा" म्हणू.
जसं मी बोललो तसे वाचकमित्र म्हणाला कि, "उद्योग
- धंद्याच्या" निगडित पैशाची भाषा कशी असते. मित्रांनो,
पैशाची भाषा हि थोड्या फार फरकाने सारखीच असते. आपल्या जीवनात थोडे बारकाईने पहिले
तर एक लक्षात येईल कि, संपर्क साधण्या साठी तुम्ही जी भाषा
वापरता ती भाषा तुम्हाला एखाद्या पासून लांब नेते किंवा जवळ आणते. तसेच काही
व्यवसाय धंद्यात असते. व्यवसाय धंद्या मध्ये तुम्ही पैसे कमावण्यासाठी जे कार्य
करता तेच कार्य तुम्हाला पैशाच्या जवळ नेते किंवा लांब घेऊन जाते. म्हणूनच व्यवसाय
धंद्या मधील "पैशाची भाषा" म्हणजे नेमकी कोणती हे जाणून घेणे महत्वाचे
आहे. नुसते जाणून नाही तर व्यवस्थित समझून घेऊन त्याचे व्यवसाय मध्ये वापर केला
पाहिजे.
आज ३ एप्रिल २०१७, म्हणजे नवीन आर्थिक वर्ष सुरु होऊन दोनच
दिवस झाले आहेत. त्यामुळे आजपासून पुढील २ ते ३ महिने यशस्वी व्यवसाय मधील
"पैशाची भाषा" काय असते ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. हि यशस्वी
पैशाची भाषा माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राला समझणे खूपच महत्वाचे आहे. याचे कारण
म्हणजे "या पृथ्वीतलावरील सर्वात पहिला उद्योग व्यवसाय हा शेतीच होय”. याच बरोबर भरपूर वाचक वर्ग हा "कृषी उद्योग"
करत आहे. त्या मुळे एक यशस्वी "कृषी उद्योग" करण्यासाठी लागणारी
"पैशाची भाषा" काई आहे व त्या भाषेचा कसा उपयोग करायचा या वर बोलणार
आहोत.
सध्याच्या पर्व हा Start up or Make in India चा आहे. खूप साऱ्या जाहिराती, तसेच शासनाच्या धोरणांमुळे असेल किंवा
इंटरनेटच्या युगात माहितीचा खजाना उपलब्ध झाल्यामुळे असेल, आजकाल start up सुरु करणे अथवा व्यवसाय करणे हे तरुणांमध्ये एक
आकर्षणाची बाब आहे. व्यवसायचं करायचा आहे व व्यवसाय करणे हे माझं Passion आहे असं नेहमी म्हणणारा तरुण वर्ग आपल्याला आढळून येतो. एखादा
व्यवसाय करण्यापूर्वी नोकरी करून अनुभव घेण्याची मानसिकता जोर धरत आहे.
ही बाब एकीकडे असताना
दुसऱ्या बाजूला द्विधा मनस्थिततीत असलेला वर्ग ही आहे. ह्या ग्रुपने पूर्वी नोकरी
केली होती. नोकरी मध्ये चांगले यशस्वी ही झाले होते. अनुभव आल्यावर व्यवसायात
प्रवेश केला. नंतर व्यवसाय / start up / उद्योग यामध्ये
चांगला फायदा होत नाही अथवा नुकसान होतय म्हणून पुन्हा नोकरीत प्रवेश केला.
या ग्रुप मधील सर्वजण द्विधा मनस्थितीत असतात. एक मन त्यांना
प्रखरपणे सांगत असते कि, पुन्हा नोकरी करावी आणि व्यवसायच
पुढे चालू ठेवावा हे दुसरे मन. या तरूण पिढी बरोबर मध्यम वयाचे उद्योजक ही आहेत.
हे सर्व उद्योजक / व्यावसायिक मागील अनेक वर्ष व्यवसायामध्ये आहेत. पण त्यांना हे
लक्षात येत नाही कि व्यवसाय त्यांचा आहे कि ते व्यवसायाचे. व्यवसायात लागणाऱ्या
गोष्टींची पूर्तता करण्यासाठी सतत व्यग्र असतात. एवढं करून सुद्धा त्यांनी नेहमीच
पैशाची चणचण भासत असते. सदैव Cash Strapped राहणारी व्यक्ती असते ही.
वरील नमूद सर्व ग्रुप
पाहीले तर एक गोष्ट प्रखरपणे लक्षात येते. व्यवसाय करणे हे कितीतरी मोठ्ठ ध्येय असल
तरी, जो पर्यंत तुम्ही यशस्वी व्यवसाय करण्याची सूत्र समझुन आत्मसात करत नाही, तो
पर्यंत तुम्हाला कोणीही यशस्वी उद्योजक / व्यावसायिक म्हणणारच नाही. आता यशस्वी
उद्योजक / व्यावसायिक म्हणजे काय हे समझुन घेणे बंधनकारक आहे.
व्यावसायिक / उद्योजक /
Enterpreneur होणे हे एकदम नैसर्गिक आहे. ही कला सर्व थरातील लोकांसाठी आहे. एक
यशस्वी उद्योग चालू करण्याची पात्रता प्रत्येक व्यक्ती मध्ये असतेच. हाच उद्योग /
व्यवसाय यशस्वी करून स्वतः चे व कुटुंबीयांसाठीचे आर्थिक स्थैर्य आरामात मिळू
शकते. “फक्त यशस्वी उद्योग कसा करायचा – हे समझुन घेणे खूपच महत्वाचे आहे.”
उद्योजक / व्यावसायिक या बाबतीतचे शिक्षण आपल्याला शाळा / कॉलेज इथून कधीच
मिळत नाही. संपूर्ण शाळा / कॉलेज उच्च
शिक्षण घेत असताना – “उत्तर चूक कि बरोबर हे दोनच पर्याय आयुष्यात असतात”, हे मनात
ठसून भरले गेले. शिक्षण म्हणजे माहिती घेणे एव्हडच आपल्याला कळले. पण या जगामध्ये
यशस्वी होण्यासाठी शिक्षणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वतः मध्ये चांगला
बदल घडवणे अपेक्षित असते. पण तसं केल जात नाही. यामध्ये तुमची काहीच चूक नाही.
कारण शिक्षणाचा खरा उपयोग कसा करायचा हे आपल्याला कधी सांगितलेच नाही. आपली शिक्षण
पद्धत तशी नाही. पण काळजी करू नका. आनंदाची बाब अशी आहे कि, “जरी तुम्ही
आजपर्यंत शाळा / कॉलेज मध्ये उद्योग / व्यवसाय कसा करायचा या बद्दल शिकला नसाल
अथवा या बाबतीत कधी विचारच केला नसाल तरीही, व्यवसायाबद्दल प्रशिक्षण आजही घेऊ
शकता”. याच कारण, यशस्वी उद्योग / व्यवसाय करण्याची कला
कैशल्य हे सहजपणे आत्मसात करता येते. तुम्ही ही सर्व कला कैशल्य आत्मसात केली कि
मग तुम्ही याचा उपयोग वारंवार करू शकता. प्रत्येक नवीन वेळी तुम्ही त्याच्यात
सुधारणा करून तुमच्या उद्धिष्टांपर्यंत लवकरात कसं पोहोचायचं यावर तुमचा आराखडा
करू शकता.
व्यवसायात यशस्वी व्हायचे
असेल किंवा यशस्वी उद्योग उभारण्यासाठी काही ठळक कौशल्य लागतात. ही सर्व कौशल्ये कमी
जास्त प्रमाणात लागतातच. एखादी गोष्ट कमी जरी असली तरी तुमचा व्यवसाय / उद्योग
यशस्वी करण्यासाठी तुम्ही घालत असलेले पैसे, वेळ वाया जाऊ शकतो. याच कारणांमुळे
जवळ – जवळ ८०% नवीन व्यवसाय हे पहिल्या २-३ वर्षात बंद पडतात आणि राहिलेले Cash
Flow व्यवस्थित नसल्यामुळे नुकसानीत असतात. यशस्वी व्यवसायासाठी ठळक / गरजेच्या
बाबी अनेक आहेत. या पैकी आपण पुढील ४ लेखांमध्ये, ४ ठळक /
गरजेच्या बाबींकडे अधिक जाणून घेणार आहोत.
१.
तुमच्या व्यवसायाचं नेमके उद्देश
काय आहे? (What is purpose of your business?)
२.
दबाब पेलण्याची क्षमता (Capacity to face the heat)
३.
विक्री व्यवस्थापन ( Sales Management)
४.
मूल्य आधारित नियमावली. (Life code of honour)
चला तर मग, यशस्वी उद्योगाच्या दिशेने प्रवास सुरु करूया.
No comments:
Post a Comment