Thursday, 9 November 2017

चक्रवाढ परताव्याची जादू


यश प्रत्येकवेळी काहीतरी पुरावा मागे ठेवतच असतं. प्रत्येक यशस्वी व्यक्ती त्याच्या जन्मापासून यशस्वी नसतो. प्रत्येक श्रीमंत व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली नसते. पण त्यांच्या आयुष्यामध्ये ते इतरांच्यापेक्षा वेगळ काहीतरी करत असतात. असं म्हणतात ना, “जर तुम्हाला आजपर्यंत मिळालेल्या आर्थिक यशापेक्षा चांगले यश हवे असेल; तर आजपर्यंत तुम्ही जे करत आला आहात त्यापेक्षा वेगळं काहीतरी केले पाहिजे.”

वेगळ म्हणजे काय ? हा प्रश्न तुमच्या समोर असेलच. मी याकडे बघताना, जीवन हे एक मोठ्ठ जंगल आहे असे मानतो. या जंगलामध्ये भरपूर अडथळे आहेत. या जंगलाच्या पलीकडे यशस्वी आर्थिक यश आहे. या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती कडे दोन मार्ग आहेत.

१.       जंगलाच्या एका बाजूला राहून जे चालतय त्याला मान्य करून रडत बसायचं.
२.       जंगलातील प्रत्येक अडथळा पार करून यशस्वी आर्थिक जीवन जगायचं.

जंगल, आर्थिक यश हे थोडस गोंधळल्यासारख झालाय ना. बघा ना जंगलातून सर्व अडथळे पार करून पलीकडे जात असताना तुम्हाला जंगली जनावरांपासून बचाव केला पाहिजे. जर जिवंत राहिला तर पलीकडे सुखरूप पोहचाल नाही तर तुमचे जीवन मधेच कुठे तरी संपून जाईल. असच काही तरी तुमच्या पैश्याबद्दल होते. पैसा एक चलन आहे. चलन असल्यामुळे पैसा कोठेही स्थिर राहु शकत नाही. पैसा खूपच चंचल आहे. त्याच मुळे पैशाच थोड थोड बीज बाजूला ठेवलं पाहिजे. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत तुम्ही ठरवलच असेल कि, “तुमच्या भविष्यासाठी, भरगोस आर्थिक यशासाठी / उत्पादनासाठी किती पैशाच बीज बाजूला ठेवणार आहात” समजा तुम्ही दरमहा फक्त रु.१०००/- बाजूला काढायचे ठरवले. याचे काय होईल ते पण आपण थोड्या वेळाने बाजूला बघूया. तत्पूर्वी मी तुम्हाला एक सत्य गोष्टी सांगू इच्छितो. हे उदाहरण मी माझ्या प्रत्येक कार्यशाळेत देत असतो.
श्री. पाटील सर हे एक निवृत्त प्राथमिक शाळेतील शिक्षक आहेत. निवृत्त होऊन त्यांना २० वर्ष झाली आहेत. म्हणजे साधारण १९४५ च्या वेळी ते प्राथमिक शिक्षण म्हणून रुजू झाले असावेत. आज त्यांनी कोणी सांगितले हे आठवत नाही, पण त्यांना मिळालेल्या आर्थिक यशाचा मंत्रामुळे ते आज ही आर्थिक स्वतंत्र उपभोगत आहेत. काय आहे तो मंत्र. अगदी साधा, सोपा मंत्र आहे हा. ह्या मंत्राच्या आधारे श्री. पाटील सरांनी त्यांच्या पहिल्या पगारापासून स्वतःला फक्त ७५% च पगार आहे असं मनात होते. म्हणजे काय, “जर तुम्हाला रु. १००/- दर महा पगार असेल, तर तुम्हाला फक्त रु. ७५/- च पगार आहे असं समझुन खर्चाच नियोजन करायच.” आज जर सरांना निवृत्त होऊन २० वर्ष झाले असतील तर त्यांना त्यांचा पहिल्या पगाराची रक्कम किती असेल . त्यावेळी त्यांना फक्त रु. १/- प्रती महा पगार असावा. त्यापैकी ७५ पैसे खर्चासाठी ठेऊन २५ पैसे किसान विकास पत्र यामध्ये गुंतवणूक केली. नुसते पहिला महिना नाही तर प्रत्येक महिन्याच्या पगारापैकी २५ % रक्कम बाजूला करून त्यांनी त्याचे किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केली. ज्या ज्या वेळी किसान विकास पत्राची मुदत पूर्ण झाली त्या त्या वेळी त्यांनी ती न मोडता परत नवीन मुदतीसाठी गुंतवणूक केली. या वरून एक लक्षात येते कि पाटील सरांची “आर्थिक शिस्त” खूपच चांगली होती.

आपण असे गृहीत धरू कि पूर्वीची ११ वी पास झाल्यावर पाटील सर प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले असतील तर साधारण वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचा नोकरीचा पहिला महिना असेल. जर त्यांचे निवृत्तीचे वय ६० पकडले तर त्यांचा नोकरीचा कार्यकाल हा ४२ वर्षांचा होईल. तेव्हा ज्या दिवशी पाटील सर निवृत्त झाले त्या दिवशी ४२x१२= म्हणजे ५०४ किसान विकास पत्र असतील. म्हणजे पुढील ४२ वर्ष दर महिण्याला त्यांच्या पेन्शन व्यतिरिक्त १ विकास पत्र त्यांच्या सेवेला असेल.
आता तुम्ही म्हणत असाल कि एवढ कोण करणार. पण एवढी आर्थिक शिस्त बाळगल्यानंतर पाटील सरांना किती पैसे दर महा मिळतील पाहूया.

जर पाच वर्षात दम दुप्पट असेल आपण उदाहरणार्थ समझुन चाललो तर पहिल्या वर्षी केलेली गुंतवणूक हि आठ वेळा दाम दुप्पट होईल. समझा एखाद्य वर्षी श्री. पाटील सरांनी दर महा रु. १०००/- म्हणजे वर्षाला रु. १२०००/- गुंतवले तर काय होईल ते पाहूया. दर पाच वर्षांनी दम दुप्पट असे ८ वेळा झाले तर ज्या दिवशी पाटील सर निवृत्त होतील त्या दिवशी पूर्वी गुंतवलेल्या पहिल्या वर्षाच्या रु. १२०००/- चे ८ वेळा दम दुप्पट झाले तर निवृत्त झालेल्या वर्षी सरांना याचे तब्बल रु. ३०,७२,०००/- (तीस लाख बहात्तर हजार रुपये) होतील. पाहिले रु. १०००/- चे महत्व.

आता तुमच्या मनात एक किंतु नावाचा प्राणी जागा झाला असेल. कि आता ५ वर्षात दाम दुप्पट कुठे मिळतात पण जर विचार करून म्युचल फंड मध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर नक्कीच चांगला परतावा मिळू पैशाचा बीज बाजूला ठेऊन त्याची पेरणी करणार आहात. जे व्यावसायिक आहेत त्यांनी येणाऱ्या प्रत्येक पैश्यामधून एक ठराविक रक्कम बाजूला काढून त्याची पेरणी करायला हवी.

“ स्वतःची आर्थिक शिस्त, हाच आर्थिक यशाचा मंत्र आहे”

No comments:

Post a Comment