नमस्कार मंडळी. सत्य पचवायला नेहमीच जड असत. मग
सत्य पचत नसेल, तर तुम्ही किती बरोबर आहात
हे दुसऱ्यांना पटवून देण्यासाठी जीवाचा आटा-पिटा करता. असाच काही प्रकार माझ्या
अनुभवी आला. आर्थिक नियोजन या विषयावरील मागील लेख वाचल्यावर मला एका वाचक मित्राचा
फोन आला. मी फोन उचलल्यावर माझ्या नावाची खात्री करून घेतली. त्यानंतर प्रश्नांचा
भडीमार सुरु केला. माझा वाचक मित्र म्हणाला, “ तुम्ही स्वतःला कोण समझता हो? इथं
जेवायची-खायची वांदे आहेत आणि तुम्ही उगाचच काहीही लिहून आम्हाला स्वप्नांच्या
दुनियेत घेऊन जाता. तुम्ही आशा
गोष्टी लिहिती कि ज्या कधीच सत्य होऊ शकत
नाही.”
आशा अनेक प्रकारच्या प्रश्नांचा भडीमार सुरु
होता. मी नुसत ऐकुन घेत होतो. ते गृहस्त माझे काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. एक
वेळ आली व माझा संयम सुटला. मी त्यांना म्हणालो, “ मी तुम्हाला एक विचार पद्धत
सांगितली आहे. तुमच्या आर्थिक यशासाठी त्याची अंबलबजावणी करणे आवश्यक आहे.”
तुम्हाला आर्थिक बाबतीत यश नको असेल तर आत्ता तुमचे जसं सुरु आहे तसेच सुरु राहू दया.
इथं अमचा संभाषण थांबले.
मित्रांनो हे संभाषण इथं लिहिल्यामागे माझा एक
उद्देश आहे. असं म्हणतात ना कि ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करता ती गोष्ट
नेहमीच मोठी होते. आता आपल्या वरील नमूद मित्रासारखे “पैसे नसण्यावर” लक्ष
केंद्रित केले तर एक लक्षात असू दया कि, “ तुमचे पूर्ण आयुष्य हे आर्थिक विवंचने
मध्ये जाईल.” पण आता तुमचा पुढचा प्रश्न असा नक्कीच असणार कि, “ इथं पैसाच शिल्लक
राहत नाही तर नियोजन काय करणार.” मित्रांनोपैसा कधीच रहात नाही. तो बाजूला ठेवावा
लागतो. पैसा एकदम चंचल असतो. नेहमी पैसा एका खिश्यातून दुसऱ्याच्या खिशात जाण्यास
उस्तुक असतो. म्हणूनच पैसा हा चंचल आहे असं म्हणतात. म्हणून काय तुम्हाला आर्थिक स्वातंत्र
कधीच मिळणार नाही असं नाही. पण त्यासाठी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्यच्या दिशेने
योग्य नियोजन करून त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. पण नक्की सुरवात कुठून
करायची हा मोठ्ठा प्रश्न तुमच्या समोर असेल ना? चला आजपासून पुढील काही दिवस
तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने प्रवास करूया.
प्रथम तुमचं आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय हे
पाहूया. आता याचा अनेक व्याख्या आहेत. पण माझ्यामते अगदी सोप्पी व्याख्या म्हणजे, “
तुम्ही कर्जमुक्त आहात व तुम्ही तुमचे आयुष्य हे तुमच्या मनाप्रमाणे जगात आहात.”
पण ही गोष्ट साध्य करायची असेल तर तुमच्याजवळ पैसा राहिला पाहिजे. पण पैसा शिल्लकच
रहात नाही ही खंत तुमच्या मनात कायम आहे. बरोबर ना. मित्रांनो इथं थोडा विचार करा.
पैसा तुमच्याकडे रहातच नाही कि तो तुम्ही शिल्लक ठेवायचा प्रयत्नच करत नाही. एक लक्षात
ठेवल पाहिजे कि, “कितीही पैसा आला तरी जर तुम्हाला पैसा शिल्लक ठेवायची सवय नसेल
तर तो शिल्लक राहणारच नाही. अशीच सवय पुढेही चालू राहिली तर तुम्ही कधीच आर्थिक
स्वातंत्र मिळवू शकणार नाही.
आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आर्थिक शिस्त
महत्वाची आहे. आशा अनेक नियम व शिस्त आहेत. यातील सर्वात महत्वाची शिस्त म्हणजे, “पहिले
स्वतः ला पैसे दया” यालाच मी म्हणतो Pay yourself
first. म्हणजेच
काय कि तुमच्याकडे जो काही पैसा दर महिन्याला येतो त्यापैकी तुमच्या परिस्थिती
नुसार बाजूला काढून ठेवला पाहिजे. पण इथं पुन्हा तोच प्रश्न सतावत असेल. शिल्लकच
रहात नाही. जरा विचार करा कि मागील काही वर्षात एकदातरी तुमच्या अपेक्षेपेक्षा
थोडा जास्त पैसे आले असतील. पण त्यावर्षी तरी शिल्लक राहिले होते का. आपण सर्व
शेतकरी मंडळी. गेली कित्येक वर्ष ज्या शेतकरी मित्राने त्याच्या शेतातले चांगले
वाणाचे बीज पुढच्या वर्षीसाठी साठवून ठेवले, त्याला शेतात्तून भरघोस, चांगल्या मालाचे उत्पादन मिळते.
चांगल्या वाणाचे बीज पुढील वर्षासाठी ठेवणे ही
शेतीतील एक शिस्त आहे. असच काही आर्थिक स्वातंत्र्याबाबतीत आहे. तुमच्या आयुष्यात,
पैशाचे बीज पेरून तुम्हाला जर त्याचे भरघोस उत्पादन हवे असेल तर, “चक्रवाढ कमाई”
याला विसरून चालणार नाही. या बद्दल आपण पुढील लेखात बघुया. तो पर्यंत तुम्ही,
तुमच्या भविष्यासाठी भरघोस आर्थिक उत्पादनासाठी किती पैशाचं बीज बाजूला शिल्लक ठेऊ
शकता हे महत्वाचे आहे. या बचतीवर चक्रवाढ कमाई काय जादू करते हे पाहिल्यानंतर
तुम्ही नक्कीच अवाक व्हाल.
No comments:
Post a Comment