Thursday, 9 November 2017

एका नव्या दिशेचा शोध - तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग 3 and 4)

दबाब पेलावण्याची क्षमता

मनस्ताप होणे आणि दबाब पेलावण्याची क्षमता ह्या दोन्हीही खूपच जादूमय गोष्टी आहेत. याबद्दल पुढे जाण्यापूर्वी थोडे माझ्याबद्दल सांगतो.

माझ्या आयुष्यामध्ये खूप अडी-अडचणी आल्या. खूप गोष्टींना ( चांगल्या / वाईट ) सामोरे जावे लागेल. या इतर अनेक गोष्टीमुळे कधी कधी खूपच मानहानी सहन करावी लागली. कित्येक वेळा एका विचित्र आणि एकदम कठीण काळातून जावे लागले. याचा अर्थ असा नाही कि माझी सर्व ठिकाणी चूक होती. पण त्यावेळी सुचवलेली कल्पना योग्य वाटली म्हणून त्यावर काम करायला सुरवात केली. प्रत्येक वेळी एकच ध्यास होता कि, “मी आज जे करतो आहे त्यापेक्षा चांगले केले पाहिजे.” जे मी पूर्वी होतो त्यापेक्षा, लोकांना / जवळच्या माणसांना बरोबर घेऊन – जरा चांगले काम करणे एवढाच निर्मळ प्रयत्न. पण झालं उलट. या ठरवलेल्या व्यवसायामध्ये फायदा तर जाऊ दया, पण मनस्ताप मात्र खूप झाला.

खूप मानस्ताप इथं पर्यंत ठिक आहे. पण या अनुभवातून माझ्या एक गोष्ट लक्षात आली. माझी व्यावसायिक वाढ होण्यापूर्वी अश्या प्रकारे अडथळे हे सुरवातीला आलेच होते. पूर्वी एवढ कधी विचार केला नाही, पण मागील दोन वर्षात यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केला. अनेक यशस्वी संघटना यांचे कार्ये पाहीले. हा सर्व अभ्यास केल्यावर हे लक्षात आले कि, “अश्या प्रकारच्या घटना प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्यात घडतातच” यशाची पायरी चढताना यातून प्रत्येक व्यक्तिला जावेच लागते. हा तर एक नमुना (Pattern) आहे. मला हे लक्षात आले कि ह्या प्रकारच्या Pattern मधून यशस्वी प्रवास केल्यावर एक खोलवर, कायमस्वरूपी राहणारे परिणाम तयार होतात.

आज जर डोळे व मन नीट उघडून पाहीले तर एक गोष्ट लक्षात येईल कि आज समाजामध्ये जी काही शोकांतिका आहे ती फक्त या प्रवासाला धीराने सामोरे जाण्याएवजी त्यापासून पळून जाण्यामुळे झालेले आहेत. आता याचा व व्यवसायाचा काय संबंध आहे असे तुम्ही म्हणत असाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि, “या प्रवासाला धीराने सामोरे न जाणे, त्यातून पळवाट काढणे यामुळे फक्त नुकसानच होत असत. रस्ता बदलला म्हणून समोरून येणारा दबाव कमी होत नाही.” या उलट नवीन दिशेला विशेष काहीच माहिती नसल्यामुळे नुकसानीचा आकडा जास्तच वाढतो. या प्रवासामध्ये अथवा या pattern मधून जात असताना, त्याला धीराने सामोरे गेल्यामुळे खूपच चांगले, विलक्षण परिणाम बघायला मिळतात. तुम्हाला, तुमच्या आयुष्यात जे हवे ते मिळवण्यासाठी हा अडथळयाचा प्रवास तुमचा तुम्हालाच मार्गक्रमण करायचा आहे. आश्चर्य ची गोष्ट म्हणजे निसर्ग तुम्हाला ही गोष्ट पावलो – पावली सांगत असतो. मित्रांनो, ही निसर्गात चाललेली प्रक्रिया किंवा निसर्गाची ही देणगी तुम्हाला विसरून चालणार नाही. याचे एकमेव कारण कि, “पृथ्वीतलावरील प्रत्येक मनुष्य हा निसर्गाचा एक छोटा भाग आहे”. चला तर मग हे काय आणि कसं ते पाहूया.

जरा विचार करा कि जंगलामध्ये एक मोठ्ठ झाड आहे ते ऊन्मळून जमिनीवर आडवे पडले. काही दिवसांनी ते झाड कुजायला लागते व कालांतराने त्याचे अस्तित्व संपून जाते. म्हणजे काय निसर्गामध्ये जी गोष्ट एकटी असते ती गोष्ट / वस्तू (या मध्ये मनुष्य प्राणी ही ओघाने आलाच) निसर्गाच्या नियमाप्रमाणे त्याचे कार्य १००% करू शकत नाही. त्यामुळे त्याचे विघटन व्हायला सुरवात होते व कालांतराने लोप पावते. या गोष्टी तुम्ही मान्य करालच.

थोडे आजू बाजूला डोळे उघडून बघा. तुम्हाला अशी एखादी व्यक्ती दिसेल जी आयुष्यात काहीही करत नाही. नुसत T.V समोर बसून राहतात. त्यांच आयुष्य, त्यांची तब्येत एकदम खराब होत असते. याच प्रमाणे काही व्यावसायिक किंवा संस्था पाहिल्यातर एक गोष्ट लक्षात येते कि, “ ते फक्त आज मध्ये जगत असतात. उद्या नक्की काय होणार आहे याचा विचार न करता व्यवसाय करत असतात. नेहमी स्वतः पुरता  स्वार्थी विचार करतात व यामुळे एकटे पडतात.” निसर्ग कधीच चुकत नाही. तो त्याचे काम एकदम अविरत पणे करत असतो. निसार्गाच्या नियमाप्रमाणे जी व्यक्ती एकटी पडते, ती निसर्गात लोप पावते. हे असच काही तुमच्या मित्र परिवार व कौटिंबीक जीवनामध्ये असते. जर एखादयाकडे तुम्ही लक्ष दिले नाही तर कालांतराने संबंधांमध्ये दूरवा येतो व संबंध संपुष्टात येत्तात. निसर्ग कधीच चुकत नाही.

जर निसर्ग नियमांप्रमाणे नाही वागलात तर लवकर तुमचं अस्तित्त्व संपून जाईल यात तिळमात्र ही शंका नाही. पण प्रत्येकजन असा नसतो. निसर्गाने प्रत्येकाला स्वतः मध्ये बदल घडवून आणण्यासाठी क्षमता ही दिली आहे. प्रचंड दबाव योग्य वातावरणांमधील योग्य संधर्भ घेउन सहन केल्यावर कोळसा सुद्धा हिऱ्यामध्ये रूपांतर होतो. हिरा या पृथीतलावरील सर्वात कठीण वस्तू आहे. कोळसा हि निर्जीव वस्तू आहे. कोळश्याला पळून जाणे हा पर्याय माहिती नसतो. कारण तो विचार करू शकत नाही. कोळसा त्या प्रचंड दबावाला सहन करत स्वतः मध्ये बदल घडवत हिरा बनतो. पण विचारवंत मनुष्य प्राण्याचे असे नाही.     माणूस एखाद्या गोष्टी पासून पळून जातो, त्याला कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्यास भीती वाटते, याचे एकमेव कारण म्हणजे त्याच्या मनावर पडणारा दबाव (Pressure) तो सहन करू शकत नसतो. निसर्ग नियमाप्रमाणे जे दिनचर्या मध्ये चालले आहे त्यातच संतुष्ट राहणे ही माणसाची प्रवृत्ती. यालाच Comfort Zone असं म्हणतात. व्यवसायात यश मिळवायच असेल तर Comfort Zone तोडून बाहेर या असे खूप गुरु सांगतात. पण ते म्हणजे नक्की काय हे समझने गरजेचे आहे.

अगदी किटका पासून ते कोणत्याही मोठ्या प्राण्यापर्यंत या जगातील प्रत्येक जीवित गोष्टींकडे त्याच्या स्वतःच्या प्रगतीसाठी आरामाच्या सवयीतून (Comfort Zone) बाहेर पडण्याची क्षमता आहे. यासाठी तुम्हाला तुमची सध्याची मानसिकता याला आव्हान दिले पाहिजे. ह्या आव्हानाला सामोरे जाणे म्हणजे जास्त दबावाला सामोरे जाणे. थोडा विचार करा; जर एखादया वेळी तुमच्या मनावर खूपच दबाव आहे, याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये खूपच ऊर्जा आहे. त्या ऊर्जेमुळे तुम्ही खूपच चलबिचल झाला आहात. कधी कधी असं वाटत ना कि मनामध्ये एक स्पोट होईल. तुम्ही अतिशय ताण तणावाच्या वातावरणा  मध्ये आहात आणि त्याच वेळी तुमच्या समोर अजून एक नवीन संकट येते. तुमची पूर्णता १०० % कोंडी झालेली असते.

मला खात्री आहे, तुमच्या व्यवसायामध्ये अश्या अनेक प्रसंगाला तुम्ही सामोरे गेला असालच. अश्या वेळी तुम्ही काय केले. या प्रसंगापासून लांब पळून गेलात कि त्याला धिटाणे सामोरे गेलात. जे व्यावसायिक अयशस्वी होतात, त्यांनी त्यांची लढाई इथं सोडून दिलेली असते. याला हारण म्हणत नाही. तर याला पळून जाणे असे म्हणतात. पण मित्रांनो, निसर्गाने आपल्याला पळून जाणे हे शिकवलेले नाही. निसर्ग असे म्हणतो कि, “या दबावाला / परिस्थितीला तुम्ही योग्य पणे सामोरे गेलात. तर योग्य वातावरण तयार होईल. अश्या योग्य वातावरणात एक विलक्षण, चमत्कारीक गोष्ट घडते”. दबावाला यशस्वी सामोरे जाण्यासाठी मानसिकता तयार व्हायला लागते. म्हणजे काय कि, “जर तुम्ही पळून न जाता व्यवसायातील दबाव तसेच इतर कोणताही ताण तणावाला याला सामोरे जायचे ठरवता. त्यावेळी तुम्ही तो दबाव तसेच सहन करण्याच्या सर्वोच्च पातळीवर असता”. यावेळी जर तुम्ही दबावाखाली दबून गेलात तर ती उर्जा तुम्हाला हरवते. जर ही उर्जा एकदम व्यवस्थित हाताळली कि काहीतरी छान घडत आणि तुम्ही अधिक ताकदवर होता. अचानक सर्व दबाव, समस्या तुमच्यासाठी खूप छोट्या होतात.तुमच्यावर असलेला ताण कमी होतो. तुम्हाला हलक – हलक वाटायला लागता.  म्हणजे काय तुमच्यावर असलेली समस्या तुमच्या पेक्षा खूपच छोटी होते. Means now you are bigger than the Problem.

तेव्हा मित्रांनो, व्यवसायात अथवा जीवनामध्ये तुमच्या समोर उभी असणारी आव्हाने, समस्या, तुमच्या विरोधात होणाऱ्या गोष्टी / घटना तुम्हाला घडवत असतात. कोणीही व्यक्ती अथवा कोणतीही संस्था / कंपनी जो पर्यंत यांच्यावर व्यवसायाचा जो दबाब (Pressure) आहे, याच व्यवस्थापन सक्षम पण करत नाही; तो पर्यंत ती संस्था कधीच उत्कृष्ट होऊ शकत नाही. दबाब व ताण तणाव व्यवस्थापन हा तुमच्या व्यक्तीमत्व सुधारण्यात खूपच महत्वाचा भाग आहे. कारण दबाब व्यवस्थापन व्यवस्थित नाही झाले तर, तो दबाव तुमच्या भावनांच्या मार्गाने बाहेर पडतो. अश्यावेळी तुमचे सर्व निर्णय हे भवनीक होऊन जातात कारण एक लक्षात राहू द्या; “मनातून भावनिक झालात तर बैधिक पातळी कमी होते” व निर्णय चुकतात.

ही विलक्षण / जादूची कांडी मला जेव्हा मिळाली तेव्हा मी जास्त त्रागा न करता होणारा मनस्ताप मला आणखी घडवण्यात खर्च केला. भावनांना मनावर ताबा घेऊनच दिला नाही. कितीही समस्या आल्यातरी शांत / तटस्थ राहिलो आणि व्यवसायात नवीन आव्ह्ने पेलून आणखी मोठा होण्यास तयार झालो.


याचमुळे माझ्या मते, इतर अनेक गोष्टींबरोबर यशस्वी व्यवसाय / उद्योग करण्यासाठी  दबाब व्यवस्थापन खूपच महत्वाचे आहे. पुढील विक्री व्यवस्थापन मध्ये वाचताना तुमच्या हे आणखी लक्षात येईल. 

एका नव्या दिशेचा शोध - तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग २)



नमस्कार मंडळी, मागील लेखा मध्ये आपण यशस्वी व्यवसायासाठीची ४ सूत्र पाहिली. तुम्हाला शब्द दिल्या प्रमाणे या लेखामध्ये त्यातील पहिल्या सूत्राबद्दल आपण थोडे सविस्तर पाहूया.
व्यवसायाचे नेमके उद्देश

यशस्वी व्यवसाय करण्यासाठी किंवा यशस्वी उद्योग उभारण्यासाठी, तुम्ही करत असलेला व्यवसाय तुम्ही का करत आहात हे तुम्हाला १००% माहिती असणे खूप आवश्यक आहे. व्यवसाय / उद्योग करण्याच अंतिम ध्येय हे पैसा कमावणे जरी असले तरी फक्त पैसे कमवायचे आहेत म्हणून जर व्यवसाय करणार असाल तर अपयशाची खात्री १००%.

Before any one starts his business he must be aware of his clear purpose.  कारण जर उद्देश स्वच्छ, एकदम पारदर्शक असतील तर तुमचे व्यवसाय मध्ये यशस्वी होण्याचे संभावना खूपच चांगली आहे. जर खूपच काळजीपूर्वक पाहीले तर एक गोष्ट लक्षात येईल कि या पृथ्वीतलावरचा प्रत्येक माणूस हा पैशाच्या मागे नसतो. ठिक आहे सुरवातीच्या काळात (म्हणजे व्यवसाय यशस्वी होई पर्यंत) पैसा ही महत्वाची गरज आहे. पण एका ठराविक उंचीवर गेल्यानंतर –पैश्यामुळे ज्या भावना तयार होतात, त्या भावना, इच्छा त्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे पैसा हवा असतो. त्यातील काही विचार / भावना या खालीलप्रमाणे आहे.

१.      पैसा आल्यावर सक्षम असण्याची भावना.
२.      स्वतंत्र असण्याची भावना.
३.      सुरक्षित असण्याची भावना.
४.      आपल्या आवडत्या माणसांची व्यवस्थित काळजी घेऊ शकू याची भावना.
५.      दुसऱ्यांना त्यांच्या गरजेला मदत करता येईल याची भावना.
६.      तुमच्या आवडी – निवडी प्रमाणे जगता येणार त्याचा आनंद.
७.      सर्वात महत्वाचे म्हणजे – तुमचे जीवन तुम्ही परिपूर्ण पणे जगू शकाल याची खात्री होते.

त्यामुळे तुमच्या व्यवसायाचे उद्देश ठरवत असताना प्रथम पैशाला महत्व देऊ नका. तुमच्या व्यवसायाचे उद्देश हा नेहमी नवीन ग्राहक तयार करणे आणि अतिशय योग्य प्रमाणात ग्राहक संतुष्ट ठेवणे हाच असावा. व्यवसाय कोणताही असो फक्त आर्थिक फायदा हा व्यवसायाचा अंतिम उद्देश असूच शकत नाही. चांगली ग्राहकसेवा दिल्यावर फायदा हा आपोआप होतच  असतो. या बद्दल आपण “विक्री व्यवस्थापन” या भागा मध्ये सविस्तर बघूया.

यशस्वी व्यवसाय करणे हे अतिशय सोप्पं आहे. यशस्वी व्यवसाय करण्याचे काही नियम आहेत. नियमांचे पालन काटेकोर पणे केले कि व्यवसाय यशस्वी होणारच. पण तसे घडत नाही. आपण नियम तोडतो व त्या प्रवासाला एकदम अवघड करून टाकतो. व्यवसाय करण्यामागचा उद्देश काय असावा, हे आपण पाहीले आहेच. पण उद्योग यशस्वी होण्यासाठी  तुम्ही काय व्यवसाय करत आहात हे तपासणे आवश्यक आहे. व्यावसायिक अथवा Enterpreneur म्हणजे नेमके काय? जो व्यक्ती दोन लोकांमधील गरज पूर्ण करते तो व्यावसायिक होतो. पण उगाचच नुसताच व्यवसाय / धंदा करावा माझी आवड आहे म्हणून एखाद्या रहिवाशी संकुला मध्ये कपड्याच दुकान टाकणे योग्य नाही. व्यवसाय सुरवात करण्यापूर्वी खालील तीन गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक आहे.

१.      सर्व प्रथम लोकांना गरजेची अशी वस्तू किंवा सेवा तयार करावी लागेल ज्यासाठी लोकं (ग्राहक) तुम्हाला पैसे देतील.
२.      तुम्ही तयार केलेली सेवा किंवा वास्तु याच विपणन (Marketing) व विक्री भरपूर प्रमाणात केली पाहिजे.
३.      व्यवसायातून येणारा पैसा, मनुष्यबळ तसेच व्यवसाय यशस्वी होण्यासाठीच्या प्रत्येक कार्य हे व्यवस्थित सांभाळता आलं पाहिजे.

जर तुमचा व्यवसाय करण्याचा उद्देश स्वच्छ पारदर्शक असेल, म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय का करायचा आहे हे एकदा कळल तर तो कसा करायचा हे आपोआपच लक्षात येईल.
मित्रांनो आज इथेच थांबूयात. पुढल्या लेखात भेटण्या पूर्वी एक छोटासा अभ्यास करूया. प्रत्येक व्यावसायिकाने स्वतःचा व्यवसाय तपासून पाहावा. तुमचे नेमके उद्दिष्ट काय आहे, तुम्हाला पैसे कशातून मिळतात. म्हणजे तुम्ही असे काय करता आहात ज्या मुळे तुम्हाला पैसा मिळतोय. तुम्ही जी गोष्ट करत आहात त्या गोष्टीची बाजारात खरोखरच गरज आहे का? जर तुम्ही विकत असलेली वस्तू बाजारातील गरज आहे, पण त्या प्रकारची वस्तू विकणारे बाजारात खूप जण आहेत तर; तुमचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय करत आहात हे तपासून पहा. जर वरील सर्व गोष्टी तुम्ही एकदम व्यवस्थित कराल तर तुमचा व्यवसाय सक्षम होईल. पण व्यवसाय म्हटले कि चढ उतार हे आलेच. जीवनात किंवा व्यवसायात जर सर्व काही एकदम सुरळीत चालले असेल तर समजायचे कि नक्की काही तरी चुकत असणार. आता या चढ उतारामुळे व्यवसायातून तुमच्या जीवनात खूप सारे ताणतणाव येतात. या ताणतणावांना यशस्वी पाने सामोरे जाणे म्हणजे स्वतःला कोणत्याही परिस्तिथीला सामोरे जाण्यास करणे होय.


तेव्हा मित्रांनो, पुढील लेखा मध्ये स्वतःमधील हिऱ्याला कसे तयार करायचे हे पाहूया. तो पर्यंत नमस्कार.

एका नव्या दिशेचा शोध - तुमच्या यशस्वी व्यवसायासाठी (भाग १)


अगदी ८ दिवसांपूर्वी एक वाचकमित्रांची भेट झाली. त्याने विचारले "पैशाची भाषा" म्हणजे नेमके काय? त्याचा हा प्रश्न खूप चांगला आहे. याचं कारण म्हणजे पैशाची भाषा हे सदर वाचताना माझा वाचक वर्ग हे अपेक्षित करत असेल कि  - गुंतवणूक कोठे व कशी करायची. पण माझ्या मते - गुंतवणूक करण्यासाठी पैसे लागतो व तो चांगल्या प्रमाणात मिळाला पाहिजे. चांगल्या प्रमाणात पैसा आला कि माणूस यशस्वी होतो. पण चांगल्या प्रमाणात पैसा कमावण्यासाठी एक विशिष्ठ प्रकारची मानसिकता लागते. त्याच यशस्वी मानसिकतेला आपण "पैशाची भाषा" म्हणू.

जसं मी बोललो तसे वाचकमित्र म्हणाला कि, "उद्योग - धंद्याच्या" निगडित पैशाची भाषा कशी असते. मित्रांनो, पैशाची भाषा हि थोड्या फार फरकाने सारखीच असते. आपल्या जीवनात थोडे बारकाईने पहिले तर एक लक्षात येईल कि, संपर्क साधण्या साठी तुम्ही जी भाषा वापरता ती भाषा तुम्हाला एखाद्या पासून लांब नेते किंवा जवळ आणते. तसेच काही व्यवसाय धंद्यात असते. व्यवसाय धंद्या मध्ये तुम्ही पैसे कमावण्यासाठी जे कार्य करता तेच कार्य तुम्हाला पैशाच्या जवळ नेते किंवा लांब घेऊन जाते. म्हणूनच व्यवसाय धंद्या मधील "पैशाची भाषा" म्हणजे नेमकी कोणती हे जाणून घेणे महत्वाचे आहे. नुसते जाणून नाही तर व्यवस्थित समझून घेऊन त्याचे व्यवसाय मध्ये वापर केला पाहिजे.

आज ३ एप्रिल २०१७, म्हणजे नवीन आर्थिक वर्ष सुरु होऊन दोनच दिवस झाले आहेत. त्यामुळे आजपासून पुढील २ ते ३ महिने यशस्वी व्यवसाय मधील "पैशाची भाषा" काय असते ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. हि यशस्वी पैशाची भाषा माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राला समझणे खूपच महत्वाचे आहे. याचे कारण म्हणजे "या पृथ्वीतलावरील सर्वात पहिला उद्योग व्यवसाय हा शेतीच होय. याच बरोबर भरपूर वाचक वर्ग हा "कृषी उद्योग" करत आहे. त्या मुळे एक यशस्वी "कृषी उद्योग" करण्यासाठी लागणारी "पैशाची भाषा" काई आहे व त्या भाषेचा कसा उपयोग करायचा या वर बोलणार आहोत.
     
सध्याच्या पर्व हा Start up or Make in India चा आहे. खूप साऱ्या जाहिराती, तसेच शासनाच्या धोरणांमुळे असेल किंवा इंटरनेटच्या युगात माहितीचा खजाना उपलब्ध झाल्यामुळे असेल, आजकाल start up सुरु करणे अथवा व्यवसाय करणे हे तरुणांमध्ये एक आकर्षणाची बाब आहे. व्यवसायचं करायचा आहे व व्यवसाय करणे हे माझं Passion आहे असं नेहमी म्हणणारा तरुण वर्ग आपल्याला आढळून येतो. एखादा व्यवसाय करण्यापूर्वी नोकरी करून अनुभव घेण्याची मानसिकता जोर धरत आहे.

ही बाब एकीकडे असताना दुसऱ्या बाजूला द्विधा मनस्थिततीत असलेला वर्ग ही आहे. ह्या ग्रुपने पूर्वी नोकरी केली होती. नोकरी मध्ये चांगले यशस्वी ही झाले होते. अनुभव आल्यावर व्यवसायात प्रवेश केला. नंतर व्यवसाय / start up / उद्योग यामध्ये चांगला फायदा होत नाही अथवा नुकसान होतय म्हणून पुन्हा नोकरीत प्रवेश केला. या ग्रुप मधील सर्वजण द्विधा मनस्थितीत असतात. एक मन त्यांना प्रखरपणे सांगत असते कि, पुन्हा नोकरी करावी आणि व्यवसायच पुढे चालू ठेवावा हे दुसरे मन. या तरूण पिढी बरोबर मध्यम वयाचे उद्योजक ही आहेत. हे सर्व उद्योजक / व्यावसायिक मागील अनेक वर्ष व्यवसायामध्ये आहेत. पण त्यांना हे लक्षात येत नाही कि व्यवसाय त्यांचा आहे कि ते व्यवसायाचे. व्यवसायात लागणाऱ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी सतत व्यग्र असतात. एवढं करून सुद्धा त्यांनी नेहमीच पैशाची चणचण भासत असते. सदैव Cash Strapped राहणारी व्यक्ती असते ही.

वरील नमूद सर्व ग्रुप पाहीले तर एक गोष्ट प्रखरपणे लक्षात येते. व्यवसाय करणे हे कितीतरी मोठ्ठ ध्येय असल तरी, जो पर्यंत तुम्ही यशस्वी व्यवसाय करण्याची सूत्र समझुन आत्मसात करत नाही, तो पर्यंत तुम्हाला कोणीही यशस्वी उद्योजक / व्यावसायिक म्हणणारच नाही. आता यशस्वी उद्योजक / व्यावसायिक म्हणजे काय हे समझुन घेणे बंधनकारक आहे.

व्यावसायिक / उद्योजक / Enterpreneur होणे हे एकदम नैसर्गिक आहे. ही कला सर्व थरातील लोकांसाठी आहे. एक यशस्वी उद्योग चालू करण्याची पात्रता प्रत्येक व्यक्ती मध्ये असतेच. हाच उद्योग / व्यवसाय यशस्वी करून स्वतः चे व कुटुंबीयांसाठीचे आर्थिक स्थैर्य आरामात मिळू शकते. “फक्त यशस्वी उद्योग कसा करायचा – हे समझुन घेणे खूपच महत्वाचे आहे.”

उद्योजक / व्यावसायिक या बाबतीतचे शिक्षण आपल्याला शाळा / कॉलेज इथून कधीच मिळत नाही. संपूर्ण शाळा / कॉलेज  उच्च शिक्षण घेत असताना – “उत्तर चूक कि बरोबर हे दोनच पर्याय आयुष्यात असतात”, हे मनात ठसून भरले गेले. शिक्षण म्हणजे माहिती घेणे एव्हडच आपल्याला कळले. पण या जगामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वतः मध्ये चांगला बदल घडवणे अपेक्षित असते. पण तसं केल जात नाही. यामध्ये तुमची काहीच चूक नाही. कारण शिक्षणाचा खरा उपयोग कसा करायचा हे आपल्याला कधी सांगितलेच नाही. आपली शिक्षण पद्धत तशी नाही. पण काळजी करू नका. आनंदाची बाब अशी आहे कि, “जरी तुम्ही आजपर्यंत शाळा / कॉलेज मध्ये उद्योग / व्यवसाय कसा करायचा या बद्दल शिकला नसाल अथवा या बाबतीत कधी विचारच केला नसाल तरीही, व्यवसायाबद्दल प्रशिक्षण आजही घेऊ शकता”. याच कारण, यशस्वी उद्योग / व्यवसाय करण्याची कला कैशल्य हे सहजपणे आत्मसात करता येते. तुम्ही ही सर्व कला कैशल्य आत्मसात केली कि मग तुम्ही याचा उपयोग वारंवार करू शकता. प्रत्येक नवीन वेळी तुम्ही त्याच्यात सुधारणा करून तुमच्या उद्धिष्टांपर्यंत लवकरात कसं पोहोचायचं यावर तुमचा आराखडा करू शकता.

व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल किंवा यशस्वी उद्योग उभारण्यासाठी काही ठळक कौशल्य लागतात. ही सर्व कौशल्ये कमी जास्त प्रमाणात लागतातच. एखादी गोष्ट कमी जरी असली तरी तुमचा व्यवसाय / उद्योग यशस्वी करण्यासाठी तुम्ही घालत असलेले पैसे, वेळ वाया जाऊ शकतो. याच कारणांमुळे जवळ – जवळ ८०% नवीन व्यवसाय हे पहिल्या २-३ वर्षात बंद पडतात आणि राहिलेले Cash Flow व्यवस्थित नसल्यामुळे नुकसानीत असतात. यशस्वी व्यवसायासाठी ठळक / गरजेच्या बाबी अनेक आहेत. या पैकी आपण पुढील ४ लेखांमध्ये, ४ ठळक / गरजेच्या बाबींकडे अधिक जाणून घेणार आहोत.

१.      तुमच्या व्यवसायाचं नेमके उद्देश काय आहे? (What is purpose of your business?)
२.      दबाब पेलण्याची क्षमता (Capacity to face the heat)
३.      विक्री व्यवस्थापन ( Sales Management)
४.      मूल्य आधारित नियमावली. (Life code of honour)
चला तर मग, यशस्वी उद्योगाच्या दिशेने प्रवास सुरु करूया.
                                                      

ध्येय पूर्तीसाठी – मार्ग दर्शक तत्वे


नमस्कार मंडळी. मागील भागात चक्रवाढ परताव्याची जादू आपण पहिली. आपण हे ही जाणून घेतले कि, “स्वतः ची आर्थिक शिस्त, हाच खरा आर्थिक यशाचा मंत्र आहे”. अनेक वेळा मी हे सांगायचा प्रयत्न केला आहे कि, तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुम्हाला का यशस्वी व्हायचे आहे त्या मागचे कारण सापडले पाहिजे. चला आज आपण हे मान्य करून पुढे जाऊ कि तुम्हाला का यशस्वी व्हायचे आहे हे नक्की समझले आहे. म्हणजे काय तुम्हाला कोठे जायचे आहे हे आता पक्क झालं आहे. आता हे ठरल्यावर त्या उद्दिष्टा पर्यंत कसं जायचा हे पाहूया.

तत्पूर्वी तुमचा जो, “का” आहे त्याच्या कडे पाहूया-
१.      तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे कारण तुम्हाला सिद्ध करून दाखवायचे आहे.
२.      तुम्हाला दुसऱ्याबरोबर स्पर्धा करून त्याला मागे पाडायचे आहे.

आता या दोन्ही कारणांमध्ये तुमच्यासाठी काहीच नाही. या मध्ये तुमचे कोणतेही एक खास उद्दिष्ट दिसून येत नाही. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या दिशेने पुढे जाण्यापूर्वी प्रत्येकाने त्यांचे कारण शोधून काढून ते व्यवस्थित आहे किंवा नाही यावर काम करा. उद्दिष्ट गाठणे म्हणजे तुम्ही आज जिथे आहात तिथून तुम्हाला जिथे जायचे आहे त्या प्रवासाने वर्णन. इतक सोप्पं आहे. यालाच इंग्रजी मध्ये Goal setting अस म्हणतात. पण इतक सोप्पं जरी असलं तरी ही प्रत्येकजण यशस्वी होत नाही. याचं कारण म्हणजे एका वेळी तुम्ही अनेक ठिकाणी लढाया लढत असता. अर्थातच तुमची ताकद विभागली जाते. आणि मग पूर्ण यश कोठेच मिळत नाही. आपले पूर्वज किंवा यशस्वी लोक नेहमी सांगत आले आहेत. एका वेळी एकच काम हातात घ्या. या ठिकाणी इतक्या कामातून तुम्हाला कशा वरती लक्ष केंद्रित करायचे हे समझले पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमचे Goal setting एकदम व्यवस्थित करणे आवश्यक आहे. तुमचे ध्येय / उद्दिष्ठ या पर्यंत पोहचण्याची मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक मांडली पाहिजेत.
ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शक तत्वे मांडताना अथवा बनवताना  खालील नमूद प्रत्येक मुद्यांचा उपयोग केला पाहिजे. चला तर मग ध्येयपूर्तीसाठी लागणारी मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत हे पाहूया.
१.       तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे ते ठरवा –

कोणतीही पर्वा न करता, ती गोष्ट होणार कि नाही याचा विचार ही न करता स्वप्न पाहायला सुरवात करा. असं समाझुनच चला कि या स्वप्नपूर्ती साठी लागणारी सर्व साधने तुमच्याकडे आहेत.
      या सर्व स्वप्नांचा तुम्ही नेहमीच विचार करत आला आहात. त्यामुळे कागद व पेन घ्या आणि अगदी १ मिनिटात लिहून काढा कि तुमच्या जीवनातील महत्वपूर्ण ध्येय कोणती आहेत. 

तुमचं ध्येय खालील कोणत्याही प्रकारात असू शकत.
१.       कमाई – या वर्षी, पुढील वर्षी किंवा पुढील ५ वर्षात तुम्ही किती पैसा कमावणार आहात.
२.       कुटुंब – तुम्हाला व तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही कोणती जीवन शैली पाहिजे.
३.       आरोग्य - नेहमीच तुमचे आरोग्य तुम्हाला कसे हवे आहे. अश्या अनेक प्रकारचे ध्येय ठरवून त्यावर काम केले पाहिजे

२.       लिहून काढा –
तुम्ही जे काही ध्येय ठरवले आहे ते लिहून काढा. ध्येय लिहिताना ते नेमके व तपशीलवार असले पाहिजे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयाला वेळेच बंधन नसेल तर ते ध्येय कधीच पूर्ण होणार नाही.
उदा: मला भरपूर पैसे कमवायचे आहेत असं जर ध्येय असेल तर भरपूर म्हणजे काय – गाडी  इथेच अडकून जाईल. त्यापेक्षा १ एप्रिल  २०१७ ते ३१ मार्च २०१८ या दरम्यान मला १० लाख रुपये कमवायचे आहेत.
जर ठरवलेल्या वेळेत १० लाख नाही तर ९ लाख मिळवले तरी ठिक आहे ना. मिळालेल्या अनुभवावर नवीन ध्येय सेट करा.

३.       अडथळे शोधून काढा –
तुमच्या ध्येयपूर्तीच्या मध्ये सर्वात मोठा अडथळा तुम्ही स्वतः च आहात. असं म्हणतात ध्येयपूर्ती न होण्याची ८० % करणे ही तुमच्या मध्ये आणि २० % बाह्य स्वरुपाची आहेत. त्यामुळे दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा नेहमी स्वतःपासून सुरवात करा.

४.       ध्येयपूर्तीच्या प्रवासात लागणाऱ्या गोष्टी म्हणजे –
अ)    लागणारे ज्ञान, कलागुण इ.
ब)  या प्रवासामध्ये तुम्हाला कोणा कोणाची मदत / सहयोग लागणार आहे याची नोंद घ्या.
कारण एक लक्षात ठेवा. कोणतीही व्यक्ती एकटे काहीच करू शकत नाही. ध्येयपूर्तीसाठी सांघिक भावना ही हवीच. या नंतर वरील सर्व बाबींची एक यादी तयार करा. या यादीमध्ये प्रत्येक पावला नंतर दुसरे कोणते हे ठरवले महत्वाचे आहे.

५.       ध्येय पूर्ती आराखडा त्तयार करा –
या आराखडामध्ये आज पासून ध्येयपूर्ती पर्यंत जाणारा प्रवास व्यवस्थित लिहून काढा. जेव्हा तुमचे ध्येय निश्चित असते व त्या ध्येयपूर्तीसाठी पोहचण्याची शक्यात ही १०००% ने वाढत.


६.       स्वयं शिस्त –
आराखडा तयार झाल्यावर सर्वात महत्वाच म्हणजे तो आराखडा व्यवस्थित पाळण्यासाठी लगणारी स्वयं शिस्त. एखादा तुमच्यामध्ये स्वयं शिस्त आली कि तुमचे कार्य व्यवस्थित सुरु राहते. त्यामुळे इथे ध्येय पुर्तीची स्वप्न बघायला तुम्हाला १००% अधिकार राहतो.
बघा इतक सोप्पं आहे. त्यामुळे मित्रांनो या जगात अशक्य असं काहीच नाही. चला तर मग, खालील पैकी काही घध्येय / उद्दिष्टे डोक्यामध्ये ठेऊन काम करा.
१.       २०१७ – २०१८ या वर्षात मी पूर्ण कर्ज मुक्त होईल.
२.       पुढील वर्षी शेती बरोबर – शेतीचा जोडधंदा करून या वर्षी पेक्षा पुढील वर्षी दुप्पट कमाई करेन.
अशी व अश्या प्रकारची अनेक ध्येय तुमच्या मनात असतील. ते प्रत्येक कागदावर मांडून त्यावर काम सुरु करा. तुम्हाला तुमच्या ध्येय पर्यंत पोहोचण्यास कोणीच अडवू शकणार नाही. अगदी तुम्ही स्वतः सुद्धा.